महाराष्ट्रवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलिसांनी पुण्यातून आरोपीला उचलले ! तेरा वर्षांपासून देत होता गुंगारा, बोगस खताचा गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – वैजापूर तालुक्यातील विरगाव पुणे जिल्ह्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. बोगस खत प्रकरणी दाखल गुन्हात १३ वर्षांपासून तो वेगवेगळी ठिकाणे बदलून व वेशांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. नाव बदलून त्याने किराणा दुकानाचा व्यवसाय थाटला होता. या किराणा दुकानाला घेराबंदी करून पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले.

अभिजीत भालचंद्र थोरात (रा. नाथाची वाडी, ता. दौंड जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हयातील पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात वर्षानुवर्ष फरार/पाहिजे असलेले आरोपीतांचा कसोशिने शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश मनिष कलावानिया, पोलीस अधीक्षक यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

याअनुषंगाने पोलीस ठाणे विरगाव येथे दिनांक 2/7/2010 रोजी गाढे पिंपळगाव येथील रेवनाथ निवृत्ती सोनवणे व इतर 09 अशा एकूण 10 व्यक्ती विरोधात अनाधिकृत रित्या बोगस खत विकल्या प्रकरणी गुरंन 46/2010 कलम 420,34, भादवी सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 व खत नियंत्रण अधिनियम 1985 कलम 3,4,5,7,8,19,21,23,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून यातील आरोपी अभिजीत भालचंद्र थोरात (रा. नाथाची वाडी, ता. दौंड जि. पुणे) हा फरार होता. या गुन्हयात तो पोलीसांना सन-2010 पासून हवा होता.

या आरोपीचा पोलीस ठावठिकाणा शोधून काढण्याचा कसोशिने प्रयत्न करत होते. परंतु आरोपी हा पोलीसांना मागील 13 वर्षांपासून त्यांचे स्वत:चे अस्तित्व लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदलून गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी हार मानलेली नव्हती. आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत असताना विरगाव पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, हवा असलेला आरोपी अभिजीत भालचंद्र थोरात हा पुणे येथील यवत या गावी स्वत:चे अस्तिव लपवून त्यांने एक किराण दुकान टाकले आहे.

तेथे तो नाव बदलून व्यवसाय करून राहत आहे. या माहितीच्या आधारे विरगाव पोलिसांच्या पथकांने तात्काळ यवत (ता. दोैंड जि. पुणे) येथे धडकले. आरोपीच्या किरणा दुकान परिसरात वेशांतर करून पोलिसांनी सापळा लावला. आरोपी हा किरणा दुकानात असतानाच त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या ओळखी बाबत खात्री झाल्याने विरगाव पोलीसांच्या पथकांने घेराव टाकून त्याच्यावर झडप घातली. त्याला जेरबंद केले.

आरोपी अभिजीत भालचंद्र थोरात (रा. नाथाची वाडी, ता. दौंड जि. पुणे) हा पोलीसांना मागील 13 वर्षांपासून त्यांचे स्वत:चे अस्तित्व लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदलून गुंगारा देत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर शरदचंद्र रोडगे, सपोनि, नवनाथ कदम, पोलीस अंमलदार विजयसिंग खोकड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!