कमरेला बंदुक लावून फिरणाऱ्या संजयनगर बायजीपुऱ्याच्या युवकास पोलिसांनी बळाचा वापर करून पकडले !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- कमरेला बंदुक लावून फिरणाऱ्या संजयनगर बायजीपुऱ्याच्या युवकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. एक अग्निशस्त्र व तीन जिवंत काडतुसे आरोपी युवकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने ही धडाकेजाब कारवाई केली. आमेर खान हुसेन खान (वय 21 वर्षे रा. बी-1 संजयनगर, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी छत्रपती संभाजीनगर लाईव्हला दिलेली माहिती अशी की, दिनांक 05/12/2023 रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे व त्यांच्या पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, पो.स्टे. जिन्सी हद्यीत (कैसर कॉलनी भागात, छत्रपती संभाजीनगर) एक जण हा स्वतःच्या कमरेला जिवंत काडतुसासह अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे.
त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकाने कैसर कॉलनी भागात जावून सदर आरोपीचा शोध घेतला असता त्याठिकाणी सदर युवक पथकाला दिसून आला. तो पोलिस पथकास पहाताच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून थोड्या अंतरावर त्यास बळाचा वापर करून ताब्यात घेतले.
त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नाव आमेर खान हुसेन खान (वय 21 वर्षे रा. बी-1 संजयनगर, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे सांगीतले. त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला तीन जिवंत काडतुसासह एक अग्निशस्त्र असा एकूण 50,450/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. अग्निशस्र व काडतूस जप्त करण्यात आले असून त्याचेविरुध्द पोलिस ठाणे जिन्सी येथे भारतीय हत्यार कायद्या व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी त्यास पो.स्टे जिन्सी येथे हजर करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त मनोज लोहीया, पोलिस उप आयुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप गुरमे, पोलिस उप निरीक्षक विशाल वोडखे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सतीश जाधव, पो. अं. संदीप तायडे, राहुल खरात, काकासाहेब आधाने, तात्याराव शिनगारे, मपोअं अनिता त्रिभुवन यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe