लग्न घरी चोरी करणाऱ्या आरोपीस नाशकातून बेड्या ठोकल्या ! चार लाखांच्या मुद्देमालासह क्रांतीचौक पोलिसांच्या हवाली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – लग्न घरी चोरी करणा-या आरोपीस नाशिक येथून मुद्देमालासह गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. एकूण 4,15,500/- रुपये किंमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे हजर करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
दिनांक 10/12/2022 रोजी पो.स्टे. क्रांतीचौक येथे दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा समांतर तपास करत असतांना ही चोरी अक्षय विगानिया याने केल्याची माहिती मिळाली. ही खात्रीलायक माहिती मिळताच दिनांक 11/12/2022 रोजी पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे यांनी पोलिस पथकासह महालक्ष्मी चाळ, नाशिक येथे जावून आरोपीचा शोध घेतला.
आरोपी अक्षय उर्फ आझाद राजेद्र विघानिया (वय 27 वर्षे रा. महालक्ष्मीचाळ, द्वारका, नाशिक) यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून गुन्ह्यातील मुद्देमाल घरातील कपाटात ठेवला असल्याचे सांगितले.
आरोपीच्या घराची झडती दरम्यान 1) 2,80,000/- (ज्यात 500/- रुपये दराच्या 560 भारतीय चलनी नोटा) 2) 75,250/- रुपये किंमतीचा एक नेकलेस पिवळ्या धातुचे 15.05 ग्रॅम वजनाचे 3) 16,100/- रु. कि. चे दोन कानातले टॉप्स पिवळ्या धातुचे 3.22 ग्रॅम वजनाचे 4) 8850/- रु. कि.चे एक गळ्यातीळ पिवळ्या थातुचा ओम पत्ता 1.77 ग्रॅम वजनाचा 5) 35,300/- रु. कि. ‘चे. एक मंगळसूत्राचे पेंडट् पिवळ्या धातुचे व 60 मनी पिवळ्या धातुचे एकूण वजन 7.06 ग्रॅम वजनाचे असा एकूण 4,15,500/- रुपये किंमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे हजर करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल दुमे, पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, पोह चंद्रकांत गवळी, पोना भगवान शिलोटे, पोअं रविंद्र खरात, पोअं विशाल पाटील, पोअं नितीन देशमुख, चापोना ज्ञानेश्वर पवार यांनी केली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe