छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठ शिक्षक निकाल जाहीर ! प्राचार्य गट खुल्या प्रवर्गातून डॉ. गोरे, खंदारे, कंधारे व कोरेकर विजयी !!

विद्या परिषद, अभ्यासमंडळाची मतमोजणी प्रगतीप्रथावर

औरंगाबाद, दि.१३ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने अधिसभा, निवडणुकीत प्राचार्य, संस्थाचालक व विद्यापीठ शिक्षक गटातील १५ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. विजयी उमेदवारांना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ.बाबासाहेब माणिकराव गोरे (१५ मते), डॉ.ीाारत दत्तात्रय खंदारे (१४), डॉ.विश्वास शामराव कंधारे व डॉ.संजय लिंबराव कोरेकर हे १३ मतांच्या कोटा पूर्ण करुन विजयी झाले. तर डॉ.दादा रामनाळा शेंगुळे हे ९ मते घेऊन (बिलोकोटा) विजयी घोषित करण्यात आले.

विद्यापीठ शिक्षक गटातून डॉ.भास्कर रामचंद्र साठे (खुला प्रवर्ग ६० मते), डॉ.वैशाली सोविंद खापर्डे (महिला ६९ मते), व डॉ.चंद्रकांत नामदेवराव कोकाटे (अनुसूचित जमाती ६५ मते) हे निवडणून आले. तसेच डॉ.पाटील गौतम भीमराव (अनुसूचित जाती प्रवर्ग – ४६ मते), डॉ.गोवर्धन कारभारी सानप (व्हीजेएनटी – ५२ मते), डॉ.हरिदास गोपीनाथ विधाते (इतर मागास प्रवर्ग – ५० मते) हे विजयी झाले. तर डॉ.शिवदास झुलाल सिरसाठ हे बिनविरोध आले असून महिला गटातील जगा रिक्त राहील आहे.

संस्थाचालक गटात खुल्या प्रवर्गातून बस्वराज विश्वनाथ मंगरुळे (३५ मते), डॉ.मेहर दत्तात्रय पाथ्रीकर (३३ मते),  हे कोटा पूर्ण करुन विजयी झाले. तर गोविंद बालासाहेब देशमुख (३२ मते) व अशिलेष शिवाजीराव मोरे हे ’बिलो काटो’ (२८ मते) विजयी घोषित  करण्यात आले.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपपत्र देण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, निवडणुक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर आदींची उपस्थिती होती. संस्थाचालक गटातून महिला प्रवर्गातून अर्चना बालासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर) व नितीन उत्तमराव जाधव (अनुसूचित जताती प्रवर्ग) हे दोघे जण अगोररच बिनविरोध निवडणून आले आहेत. निवडणूक प्रक्रियेचे संचालन डॉ.पी.व्ही.देशमुख व डॉ.वैâलास अंभुरे यांनी केले.

दरम्यान बॅडमिंटन कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठ शिक्षक व अभ्यास मंडळाची निवडणूक प्रक्रिया संपली तर दुपारनंतर महाविद्यालयीन शिक्षक (१० जागा) व विद्या परिषद (सहा जागा) या गटातील मतमोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, पोलीस उपनिरिक्षक विशाल बोडखे, अनिता बागूल, शरद वाणी तसेच सुरक्षा अधिकारी बाळासाहेब इंगळे, दिनकर जमदाडे आदींनी प्रयत्न केले.

अधिसभा गट, प्रवर्गनिहाय जागा , उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे

प्राचार्य – १० जागा

(५ खुला प्रवर्ग, ५ राखीव)
– विजयी उमेदवार :
डॉ.बाबासाहेब गोरे – १५,
डॉ.विश्चास कंधारे – १३,
डॉ.भारत खंदारे- १३,
डॉ.संजय कोरेकर – १४,
डॉ.दादा शेंगुळे -९

पराभूत उमेदवार
डॉ.गणेश अग्नीहोत्री – ८ मते,
डॉ.दत्तात्रय वाघ ४,
डॉ.राजकुमार मस्के -१.

अनुसूचति जमाती प्रवर्ग (ST,)
डॉ.शिवदास शिरसाठ – बिनविरोध

अनुसूचित जाती प्रवर्ग – (SC)

डॉ.गौतम पाटील – ४६ विजयी,
डॉ.राजकुमार मस्के – ३१,

भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग – (VJNT)

डॉ.गोवर्धन सानप- विजयी -५२,
डॉ.राजेंद्र परदेशी – २१

इतर मागास प्रवर्ग (OBC)

डॉ.हरिदास विधाते- ५० विजयी,
डॉ.शहाजहान मनेर- २४

महिला प्रवर्ग – रिक्त

विद्यापीठ शिक्षक – ३ जागा.

खुला प्रवर्ग-
डॉ.भास्कर सांठे (विजयी)- ६०,
डॉ.सतीश दांडगे- ३३
डॉ.संजय साळुंके – ४२
डॉ.अशोक पवार-१

अनुसूचित जाती प्रवर्ग (SC)

डॉ.चंद्रकांत कोकाटे (विजयी-६५मते)
डॉ.गोपीचंद धरणे – ४२,
डॉ.भगवान गव्हाडे-१५

महिला प्रवर्ग –
डॉ.वैशाली खापर्डे (विजयी – ६९ मते)
डॉ.फराह गौरी नाझ- ५२

संस्थाचालक – ४ जागा

विजयी उमेदवार –

बस्वराज मंगरुळे- ३५,
डॉ.मेहेर पाथ्रीकर- ३३,
गोविंद देशमुख- ३२
अश्लेष मोरे-२८ .

पराभूत –
संजय निंबाळकर -२८ मते
विनायक चोथे – १५,
किशोर हंबर्डे – १७,

Back to top button
error: Content is protected !!