छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबारानंतर बर्निंग कारचा थरार ! वैजापूरजवळ सुसाट कार पेटली, चौघे बचावले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून नुकतेच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ आज बर्निग कारचा (एम एच १४ ए.यु ७९३९) थरार पाहायला मिळाला. भरधाव कार पेटल्याचे कळताच चालकासह चौघे कारमधून सुखरुप बाहेर पडले. त्यानंतर या आगिने रौद्र रुप धारण करून कारला आपल्या कवेत घेतले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर सावंगी जवळील बोगद्यानजीक हवेत गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच आज वैजापूरजवळ बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या महाराष्ट्राच्या भाग्यरेखावर मात्र अग्निशामक यंत्रणाची कमतरता यामुळे भासली.

 दीपा राजपूत, राजेश राजपूत ,सुरेश राजपूत, नितीन राजपूत (रा. भोसरी, पुणे) अशी या कारमधून सुखरुप बचावलेल्या प्रवाशांची नावे आहेत.

आज, १५ डिसेबर रोजी सायंकाळी या कारला आग लागली. चालकाला आगिचा अंदाज येताच त्याने स्पिड कमी करून गाडी थांबवली. त्यानंतर चौघे बाहेर पडले. पुणे येथील नितीन राजपूत (रा. भोसरी, पुणे) हे आपल्या परिवारासह सिंदखेडराजा राजा येथून शिर्डी मार्गे पुण्याकडे जात होते.

सध्या समृद्धी महामार्गाची चर्चा आहे. त्यामुळे या महामार्गावरून जाण्यासाठी अनेक जण आपल्या गाड्याचे स्टेअरिंग वळवत या महामार्गावरून प्रवास करण्यास उत्सुक आहेत. त्यानुसार ते कारने (एम एच १४ ए.यु ७९३९) या महामार्गावरू प्रवास करत असताना वैजापूर शिवारातील गलांडे वस्ती परिसरात चालकाला कारमधून धूर निघत असल्याचा अंदाज आला.

त्याने लगेच कार थांबवली. दीपा राजपूत, राजेश राजपूत ,सुरेश राजपूत हे कारच्या बाहेर पडले. यानंतर मात्र, कारने पेट घेतला. आगिने कारला आपल्या कवेत घेतले. त्यांच्या डोळ्यासमोर कार जळत राहिली. मात्र. या महामार्गावर आग विझवण्यासाठी अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने कार त्यांच्या डोळ्यासमोर जळाली.

वाहनचालकांकडून भरमसाठ टोल घेऊनही सुविधा देण्यात, अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात महामार्ग प्रशासनाला अपयश आल्याचे या घटनेवरून दिसून येते.

Back to top button
error: Content is protected !!