छत्रपती संभाजीनगर
Trending

वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, बिडकीन, वाळूज, पडेगाव, बीड बायपास, हर्सूल परिसरातील २४ हॉटेलवर गुन्हे दाखल ! ४५ मद्यपींवरही कारवाई !

३१ डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – परवाना नसतानाही हॉटेलात दारुची पार्टी करणे २४ हॉटेलचालकांना महागात पडले. याशिवाय ४५ मद्यपींवरही कारवाई करण्यात आली. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोहीम राबवली. या मोहीमेदरम्यान वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, बिडकीन, वाळूज, पडेगाव, बीड बायपास, हर्सूल परिसरातील २४ हॉटेलवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक (अ. व द.) सुनील चव्हाण, विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक संतोष झगडे यांनी व त्यांनी नेमलेल्या विशेष पथकांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दि.३०/१२/२०२२ व दि.३१/१२/२०२२ रोजी एकूण ३५ गुन्हे नोंदविले. एकूण ६८६.३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एकूण २४ अवैध धाबे चालविणारे धाबा मालक यांच्यावर व अवैधरित्या धाब्यावर बसून मद्य प्राशन करणाऱ्या ४५ मद्यपींवर कारवाई केली.

या अवैध धाब्यांबर (हॉटेल) केली कारवाई –

१. हॉटेल हैप्पी अवर, बाळापूर फाटा

२. हॉटेल माऊली, पडेगाव

३. हॉटेल साई बन्सी, वाळूज एमआयडीसी

४. हॉटेल शिवराज, पिसादेवी शिवार

५. हॉटेल बळीराजा वाळूज एमआयडीसी

६. हॉटेल शेतकरी, वाळूज एमआयडीसी

७. हॉटेल मराठा, साजापूर

८. हॉटेल ओम साई, झारी फाटा, खुलताबाद

९. हॉटेल अनुष्का, फुलंब्री खुलताबाद रोड

१०. होटल दिशा अंधारी, सिल्लोड

११. हॉटेल ओम श्री साई, लाडसावंगी रोड

१२. हॉटेल सह्याद्री, बिडकीन

१३. हॉटेल भरत, शिवराई फाटा, गंगापूर

१४. हॉटेल जय महाराष्ट्र, नांदगाव, वैजापूर

१५. हॉटेल हायवे धाबा, नांदगाव, वैजापूर

१६. हॉटेल तुळजाई, सुंदरवाडी

१७. हॉटेल राजमाता, हर्सूल टी-पॉइंट

१८. हॉटेल खुशी, हर्सूल

१९. हॉटेल साईपालखी, जाधववाडी

२०. हॉटेल श्री सेवा जाधववाडी

२१. हॉटेल सुरेश हर्सूल टी-पॉइंट

२२. जळगाव रोडवरील हॉटेल

२३. हॉटेल ओम साई, बीड बायपास

२४. हॉटेल रुद्रा, बीड बायपास

कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी ” दारू पितांना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. तसेच हॉटेल / ढाबा मालक व हॉटेल / ढाब्यावर देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!