महावितरण शेंद्रा एमआयडीसीच्या तंत्रज्ञाने मीटरमध्ये बदल करण्यासाठी ४० हजारांची लाच मागितली !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – इंडस्ट्रियल मीटरचे कमर्शियल मीटरमध्ये बदल करून कमर्शियल मीटर करून देण्यासाठी तडजोडीअंती ४० हजारांची लाच मागितली. याप्रकरणी महावितरण शेंद्रा एमआयडीसीच्या तंत्रज्ञावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
अनिल आसाराम गरंडवाल (वय 32 वर्षे व्यवसाय नोकरी, पद- तंत्रज्ञ, एम एस ई बी शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद (वर्ग-३) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांचे इंडस्ट्रियल मीटरचे कमर्शियल मीटरमध्ये बदल करून कमर्शियल मीटर करून देण्यासाठी व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 60,000/-रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 40,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित, पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अनिता ईटुबोने, पोलीस निरीक्षक, सहाय्यक अधिकारी संदीप राजपूत, पोलीस निरीक्षक, हनुमंत वारे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोअं/जोशी, पाठक, वाघ, नागरगोजे, चालक पोअं/ देवसिंग ठाकूर, चांगदेव बागुल यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe