छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

पैठण MIDC तील कंपनीला खंडणी मागणारा जेरबंद ! उद्योजकाला चार कोटी व महिन्याला २० हजारांचा हप्ता मागितला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – एम.आय.डी.सी. पैठण येथे कंपणी चालवायची असेल तर 4 कोटीची खंडणी व 20,000/- रूपये प्रति महिन्याची खंडणी मागणाऱ्याला पोलिस अधिक्षकांनी चांगलाच हिसका दाखवला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या विरोधात विविध सरकारी कार्यालयात खोट्या तक्रारी दाखल करून कंपनीस जेरीस आणून खंडणी उकळण्याचा त्याचा मनसुबा ग्रामीण पोलिसांनी हाणून पाडला.

विष्णू आसाराम बोडखे (वय 57 वर्षे रा. सेंटपॉल, मुधलवाडी ता. पैठण) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. दिनांक 1/12/2022 पासून एम.आय.डी.सी पैठण अंतर्गत येणा-या एम.आय.डी.सी. मुधलवाडी मधील एका नामवंत कंपनीच्या उघोजकासह त्यांच्या कंपनी व्यवस्थापकाला वारंवार कंपनीमध्ये जावून मारहाण करण्याच्या धमक्या दिल्या. कंपनीच्या कारभारा विरोधात विविध सरकारी विभागात खोटे तक्रारी अर्ज देवून कंपनीची बदनामी करून त्रास देणा-या तसेच हा त्रास थांबवायचा असेल तर 04 कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी करून तात्काळ 05 लाख कॅश व 20,000/- रुपये महिना खंडणीची मागणी करणा-या विरुध्द पोलीस ठाणे एम. पैठण येथे दिनांक 23/5/2023 रोजी भादंवी कलम 384,385,452,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी उद्योजक व व्यवस्थापन अधिकारी यांनी मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून तक्रार केली की, पोलीस ठाणे एम. पैठण अंतर्गत मुधलवाडी येथील विष्णू आसाराम बोडखे (वय 57 वर्षे रा. सेंटपॉल, मुधलवाडी ता. पैठण) हा दिनांक 1/12/2022 पासून कंपनीचे मालक व व्यवस्थापन अधिकारी यांना कंपनीत येवून धमक्या देत आहे. तुम्ही कंपनी कशी चालवता हेच बघतो, मी कंपनीच्या मालक व व्यवस्थापन अधिकारी यांना कंपनीत येवून मारहाण करिल व कोणाला कसे फसवायचे हे मला माहिती आहे. अशा धमक्या देवून कंपनीच्या विरोधात विविध शासकीय कार्यालयांत तक्रारी अर्ज दाखल करत होता. व हे तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या देवून पैशाची मागणी करत असे. यावर त्याने कंपनी व्यवस्थापकाकडुन कंपनीची बदनामी थांबवून त्या बाबतच्या तक्रारी मागे घेण्यासाठी  1,50,000/- ( एक लक्ष, पन्नास हजार रूपये)  खंडणी म्हणून डिसेंबर/2022 मध्ये घेतले होते.

परंतु यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने पुन्हा कंपनी व्यवस्थनाला वारंवार धमक्या देणे सुरू केले. कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने परत विधिध सरकारी कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व कंपनीच्या विरोधात तक्रारी अर्ज करणे सुरू केले होते. यावर त्यास अनेकवेळा कंपनी शासकीय नियम व धोरणानुसारच चालते याबाबत समजावून सांगितले परंतु तो वारंवार धमकी देवून पैशाची मागणी करत होता. यावर त्याने कंपनीत येवून तक्रारी अर्ज कायमचे बंद करून कंपनीची बदनामी थांबवायची असेल तर 4 कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली व सध्या 05 लक्ष रुपये व 20,000/- रुपये महिना द्यावे लागेल अशी धमकी देवून खंडणी मागत होता.

यावर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ तक्रारीची गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश दिले. यावरून पोलीसांनी विष्णू आसाराम बोडखे (वय 57 वर्षे रा. सेंटपॉल, मुधलवाडी ता. पैठण) यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्यास जेरबंद करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा हद्यीतील एम.आय.डी.सी.तील कोणत्याही कंपनी किंवा उद्योजकांना अशा प्रकारे विनाकारण त्रास देवून त्यांच्याकडून बळजबरीने पैशाची मागणी करणा-या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. अशा व्यक्ती विरोधात सक्त व कठोर भूमिका घेण्यात येईल. अशा प्रकारे कोणी खंडणीची मागणी करत असेल तर तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी.  जिल्हयातील कंपनी मालक व व्यवस्थापक यांना अशा व्यक्तीपासुन सुरक्षिततेची हमी देवून त्यांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध करून देण्या बाबत पोलिस अधीक्षक यांनी आश्वसत केले आहे. ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि भागवत नागरगोजे, पो.उप.नि. दिलीप चौरे, राहुल मोहतमल, कृष्णा उगले, मिलींद घाटेश्वर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!