खुलताबादछत्रपती संभाजीनगर
Trending

खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उर्स २१ सप्टेंबरपासून ! कलेक्टर, एसपींनी दिली भेट; सीसीटिव्ही, पार्किंग, पिण्याचे पाणी, वीज पुरवठ्याची माहिती घेऊन दिले निर्देश !!

खुलताबाद येथील उर्स स्थळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी केली पाहणी

संभाजीनगर लाईव्ह, दि. 7 – खुलताबाद येथील दर्गाह हजरत शे.मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष येथील उर्स दि.21 पासून सुरु होत आहे. यानिमित्त उर्स स्थळाची पाहणी आज जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केली.

हा उर्स उत्सव दि.21 पासून सुरु होत आहे. याठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यादृष्टिने येथील प्रशासनातर्फे करावयाच्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी खुलताबादचा येथे भेट दिली. दर्गाह जर जरी जर बक्ष व परिसर मैदान, रस्ते इत्यादीची पाहणी केली.

दर्गाह कमिटीच्या वतीने अध्यक्ष एजाज अहेमद अहमद, उपाध्यक्ष इम्रान जाहगिरदार, सचिव मतीन जाहगिरदार यांनी त्यांचा सत्कार केला. कमिटी सदस्य ॲङ हाजी कैसरोद्दीन हाजी जहरोद्दीन ,एजाज अहेमद, नईमबक्ष, इम्रान यांनी उर्स व्यवस्थे संबधी विविध विषय मांडले. या कालावधीत सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिने लागणारे सी.सी.टिव्ही. कॅमरे, मैदान आणि पार्किंग व्यवस्था तसेच पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता सुविधा या व्यवस्थांबाबत माहिती घेतली.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार व नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आवश्यक सुचना केल्या. उपजिल्हाधिकारी संतोष गरड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लाजेवार, तहसिलदार स्वरुप कंकाळ, मुख्याधिकारी विक्रम दराडे, गटविकास अधिकारी प्रशांत नाईक,पोलीस निरीक्षक भूजंग हातमोडे, सहपोलीस निरीक्षक अमोल ढाकणे तसेच स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!