महाराष्ट्र
Trending

अंबाजोगाईत तलवार घेवून फिरणारा, दहशत माजवणाऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले ! शेतातील पिकात दडवून ठेवल्या होत्या तीन तलवारी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – अंबाजोगाई शहरातील पाण्याच्या टाकी परिसरात युवक तलवार घेवून फिरताना व दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला एका तलवारीसह पकडले. त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता राडी शिवारातील शेतातील पिकात त्याने तीन तलवारी दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जावून त्या तलवारी जप्त केल्या.

आदित्य आनंत काटे (वय 19 वर्षे रा. ममदापूर ता. अंबाजोगाई, जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे. पोहेकॉ अमोल जालीदर गायकवाड (पोलिस स्टेशन अंबाजोगाई शहर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 23/09/2023 रोजी पोहेकॉ अमोल गायकवाड व पोउपनि मैढके, घोळवे, पोअ लाड गुन्हयाचा तपास करण्यासाठी पोलिस स्टेशन हदीत रवाना झाले. पो.उप.नि. मेंढके यांना गोपनिय बातमी मिळाली की, पाण्याची टाकी परीसर अंबाजोगाई येथे एक युवक हातात तलवार घेवून फिरत आहे.

त्यामुळे दहशीतीचे वातावरण झाले आहे. ही माहिती मिळताच पोअ नागरगोजे, पोअ चादर, पोअ काळे हे पंचासह त्या युवकाचा शोध घेण्यासाठी निघाले. 15:30 वाजेच्या सुमारास लातूर रोड बाजूस अंबाजोगाई येथे एक युवक हातात तलवार घेवून फिरत असताना मिळून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्य आनंत काटे (वय 19 वर्षे रा. ममदापूर ता. अंबाजोगाई, जि.बीड) असे सांगितले.

पोलिसांनी तलवारीचा जप्ती पंचनामा करून आरोपी आदित्य यास विश्वासात घेवून तलवार कोठून आणली. व आणखी किती आहेत असे विचारले असता त्याने सांगीतले की, राडी शिवारातील शेतामध्ये सोयाबीनच्या पिकात आणखी तलवार ठेवलेल्या आहेत, असे सांगितले. पोलिस तातडीने राडी शिवारात पोहोचले असता आरोपीने त्याच्या शेतातील सोयाबीन पिकातून तीन तलवाली काढून दिल्या.

पोहेकॉ अमोल जालीदर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य आनंत काटे (वय 19 वर्षे रा. ममदापूर ता. अंबाजोगाई, जि.बीड) याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!