महाराष्ट्र
Trending

तलाठ्याला धमकावले, तुम्ही काय इथे झक मारता का ? नैसर्गीक आपत्तीचे पैसे खात्यात जमा झाले नाही म्हणून तलाठ्याला खूर्चीवर लोटले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – नैसर्गीक आपत्तीचे पैसे खात्यात जमा झाले नाही याचा जाब विचारून तलाठ्याला लोटलाट केल्याची घटना कृषी उत्पन्न बाजार समीती धाड नाका परिसरातील काम्प्लेक्स मधील गाळा क्रमांक 19 बुलडाणा येथे घडली. नैसर्गिक आपत्तीची यादी वरिष्ठांकडे पाठवली असल्याचे सांगताच तुम्ही काय इथे झक मारता, अशी शिवीगाळ करून तू इथे कसा काय काम करतो तुला बघून घेतो अशी धमकीही दिल्याचे तलाठी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी विशाल अशोक सोनुने (वय अंदाजे 32 वर्षे रा. सागवन) असे आरोपीचे नाव आहे. तलाठी नितीन उत्तमराव अहिर (वय 46 वर्षे, रा. विश्वास नगर चिखली रोड बुलडाणा) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सागवन कोलवड येथे तलाठी या पदावर ते कार्यरत आहे. तहसीलदार बुलडाणा यांच्या परवानगीने कृषी उत्पन्न बाजार समिती धाड नाका परीसरातील काम्प्लेक्स मधील गाळा क्रमांक 19 हा शासकीय कामकाजासाठी भाडे तत्वावर घेतलेला आहे. सदर गाळ्यामध्ये ते शासकीय कामकाज करत असतात.

दिनांक 10/10/2023 रोजी दुपारी 02:45 वा तलाठी नितीन अहिर व मददतनीस शशीकांत वामन हिवाळे हे नैसर्गीक आपत्तीचे शासकीय कामकाज लॅपटॉपवर करीत असताना तेथे विशाल अशोक सोनुने (वय अंदाजे 32 वर्षे रा. सागवन) हा आला. मददतनीस शशीकांत हिवाळे यांना म्हणाला की, नैसर्गीक आपत्तीचे पैसे माझ्या खात्यात जमा झाले नाही. असे म्हणून वाद घालत असताना तलाठी नितीन अहिर यांनी सांगितले की, नैसर्गीक आपत्तीची यादी वरिष्ठांना पाठवलेली आहे.

असे म्हटले असता विशाल याने तलाठी नितीन अहिर यांना तुम्ही येथे काय झक मारता का, असे म्हणून लोटपाट करून लोटून दिले. त्यामुळे तलाठी नितीन अहिर हे मागे खुर्चीवर पडले. यामुळे त्यांच्या पाठीला जोरात मुक्का मार लागला. लॅपटॉप टेबलवरून खाली फेकून दिला. त्यामुळे लॅपटापचे तुटून नुकसान झाले आहे. त्यावेळी तेथे हजर असलेले मददतनीस शशीकांत हिवाळे यांना सुध्दा त्याने शिवीगाळ केली व तलाठी नितीन अहिर यांना ‘तू इथे कसा काय काम करतो तुला बघून घेतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी तलाठी नितीन उत्तमराव अहिर (वय 46 वर्षे, रा. विश्वास नगर चिखली रोड बुलडाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल अशोक सोनुने (वय अंदाजे 32 वर्षे रा. सागवन) याच्यावर बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!