महाराष्ट्र
Trending

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांवर आक्षेपार्ह पोस्ट ! बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल, पोलिस अलर्ट मोडवर !!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणार्या सोशल मीडियावरील पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे.

यासंदर्भात फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 12/11/2023 रोजी 04.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या मोबाईलवर फेसबुक अॅप ओपन करून कमेंटस पाहत होते. त्यांना त्यांच्या मोबाईलवर चोले बीड जिल्हा ही आय. डी. दिसली. त्यावर राजाभाऊ रामदास चोले (रा. ताडसोन्ना ता. जि. बीड) याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केलेली दिसली. “नेमका हा जरांगे कोण आहे हा वाळुचे टिप्पर अडवून हप्ता मागणार तर नाही ना” अशी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.

तसेच दुसरी पोस्ट अतिशय गंभीर आहे. मराठा समाजा विषयी व सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून दंगा घडवून आणण्याच्या उ‌द्देशाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी राजाभाऊ रामदास चोले (रा. ताडसोन्ना ता. जि. बीड) यांच्याविरुध्द बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!