छत्रपती संभाजीनगर
Trending

दुधात गोळ्या मिसळून शारीरिक संबंध, मोबाईलवर घाणेरडे व्हिडियो व नग्न करून नाचायला लावले ! आरोपीवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – दुधात गोळ्या मिसळून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार महिलेने दिली आहे. मोबाईलवर घाणेरडे व्हिडियो पाठवून पूर्ण नग्न करून नाचायला लावल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले असून याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

दि. 01/01/2020 रोजी 00.00 ते दि. 23/11/2023 रोजी वेळ 00.00 वाजेदरम्यान भारतनगर, छत्रपती संभाजीनगर या परिसरात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे राहत्या घरी असताना फिर्यादी सोबत इच्छा नसताना वारंवार शारीरिक संबंध केले.

विरोधक हा फिर्यादीचे लग्न लावून देणार ते फिर्यादीस मान्य नसल्याने त्याला लग्न करणार नाही असे सांगितले तेव्हा तो फिर्यादीस म्हणाला की, एकतर लग्न कर किंवा माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवत जा नाही तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी देत वारंवार फिर्यादी सोबत शारिरीक संबंध ठेवले. आरोपीने फिर्यादीला परत भारतनगर येथे घेवून आला.

भारतनगर येथे राहण्यास असताना देखिल विरोधकाने चॉकलेटी रंगाच्या गोळ्या कधी दुधात कधी पाण्यात असे काही काही कारण सांगून खायला देत असे. तसेच त्याच्या मोबाईलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवित असत व त्यानंतर फिर्यादीवर बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित करत असत. तसेच कधी कधी फिर्यादीला पूर्ण नग्न करुन नाचायला लावत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये  440/2023 कलम- 376, 376(2), (n), 376(3), 323, 504,भादवी तसेच बा.लै.अ.सं. अधि 4,5(L),5 (N),6,8, 11(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मपोउपनी माळी करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!