मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 मीटर ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले, मातीशी नाळ आणि शेतकऱ्यांना साथ !
- हा क्षण लाभर्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पुद केल्या.
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील शेती आणि शेतकरी हा जिव्हाळयाचा विषय आहे. याचाच प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. राज्यातील शेतकऱ्यासाठी विविध हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतले आहे. कधी शेतीच्या बांधावर जात पिकाची पाहणी करणे असो किंवा गारपीट व अवकाळी मुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवाना दिलेला मदतीचा हात आणि आधार असो हे नेहमीच त्यांच्या कर्तव्य दक्षतेने व तळमळीने ते काम करत असतात.
मुख्यमंत्री असून देखील ते एक शेतकरी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव स्वत: लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्अर वाटपाच्या वेळी आला. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेले हार्वेस्टरची माहिती घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी जवळपास 500 मीटर ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभर्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पुद केल्या.
आपुलकीची भावना, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रती असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याच्या निर्णयानातुन दिसतो.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe