महाराष्ट्र
Trending

महावितरणकडे जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर 10 लाख वीजग्राहकांना व्याजापोटी 6 कोटींचा परतावा !

सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरुन सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन

नांदेड, दि. 22 जून : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी नांदेड परिमंडल अंतर्गत येणाऱ्या नांदेड,परभणी तसेच हिंगोली जिल्हयातील लघू दाब वर्गवारीतील 10 लाख 72 हजार 702 वीजग्राहकांना 6 कोटी 3 लाख 21 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. सन 2022-2023 करिता ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनिमय 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्धारीत दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

तसेच विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन 2022-23 मध्ये नांदेड परिमंडलातील 10 लाख 72 हजार 702 लघुदाब वीजग्राहकांना 6 कोटी 3 लाख 21 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

यामध्ये नांदेड जिल्हयातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषीपंप तसेच इतर वर्गवारीतील 5 लाख 83 हजार 66 वीजग्राहकांना 3 कोटी 21 लाख 39 हजार रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. तर परभणी जिल्हयातील 2 लाख 95 हजार 625 ग्राहकांना 1 कोटी 68 लाख 47 हजार रुपयांचा, त्याचबरोबर हिंगोली जिल्हयातील 1 लाख 94 हजार 11 वीजग्राहकांना 1 कोटी 13 लाख 34 हजार रुपयांचा परतावा सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आला आहे.

नांदेड परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनीअतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!