मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांवर आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या हॉटेल चालकावर गुन्हा !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३०- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांवर आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २८ मे रोजी १९.३२ ते २१.०० वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.
समाधान उर्फ दीपक बद्रिनाथ नागरे (वय ३१, धंदा- हॉटेल व्यवसाय, रा. शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी याने त्याच्या व्हॉट्सअप सोशल मिडीया अॅपवरुन व्हॉट्सअप या सोशल मीडियावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल रात्री 07.32 वाजेच्या सुमारास आक्षेपार्ह विधान लिहून स्टेटस ठेवले.
दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी शत्रुत्व निर्माण व्हावे या उद्देशाने स्टेटस ठेवल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार दिली. दरम्यान, यो सोशल मीडिया पोस्टमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी व समाजसेवकांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर प्रकरण निवळले.
या तक्रारीवरून समाधान उर्फ दीपक बद्रिनाथ नागरे याच्यावर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गु.र.न 234/2024 कलम 505(1) (क), 505 (2),294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि घोरपडे करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe