टॉप न्यूजसिल्लोड
Trending

सह दुय्यम निबंधक छगन पाटलाने जमवली १ कोटी ८० लाखांची माया ! पत्नीवरही गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ – भ्रष्ट्राचाराच्या सापळ्यात अडकलेले सह दुय्यम निबंधक छगन पाटलाने १ कोटी ८० लाखांची माया जमवली असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाला असून गैरमार्गाने जमवलेली माया उघड झाल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाला भ्रष्ट्राचाराची किती किड लागलेली आहे हे यावरून दिसून येते.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आलोसे छगन उत्तमराव पाटील, सह दुय्यम निबंधक, सह निबंधक कार्यालय, सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर (वर्ग-2)  यांच्या विरुध्द दिनांक 02/03/2024 रोजी सापळा कारवाई नंतर पो.स्टे.सिल्लोड शहर गु.र.नं.38/2024 अन्वये कलम 7, भ्र.प्र.अधि.1988 अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.

गै.अ.यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान लोकसेवक छगन उत्तमराव पाटील, सह दुय्यम निबंधक (वर्ग-2) यांनी दिनांक 02/03/2024 रोज पावेतोचे त्यांचे सेवा कालावधीत व परिक्षण कालावधी दरम्यान भ्रष्ट व गैरमार्गाने, कायदेशिर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी, 1,80,80,155/- रुपये इतक्या रक्कमेची मालमत्ता संपादित केली असून त्यांची टक्केवारी वजा 284.45 टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच सौ.वंदना छगन पाटील यांनी सदर मालमत्ता संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने गै.अ. आलोसे श्री.छगन उत्तमराव पाटील, सह दुय्यम निबंधक, (वर्ग-2) व त्यांच्या पत्नी सौ. सौ.वंदना छगन पाटील यांचे विरुध्द पो.स्टे.बेगमपुरा गु.र.नं.-171/2024 कलम 13(1)(ब) व (2)  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सह भा.द.वि.कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Back to top button
error: Content is protected !!