भगवान बाबांच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली ! जाता जाता मंदिरातील सर्व वायरिंग तोडली !!
जालना जिल्ह्यातील रानमाळा गावातील घटना, मंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – भगवान बाबांच्या मदिरातील दानपेटी चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेली. चोरी करून जाता जाता मंदिरातील सर्व वायरिंगही त्यांनी तोडली. ही घटना रानमाळा (ता. मंठा, जि. जालना) या गावात घडली. याप्रकरणी सरपंचानी पोलिसांत धाव घेतली असून पुढील तपास मंठा पोलिस करत आहे.
दत्ताराव कोंडीबा कांगणे (वय 58 वर्षे व्यवसाय शेती व सरपंच रा. रानमाळा ता. मंठा जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार गावात भगवान बाबाचे मंदिर आहे. गावातील मंदिरात रोज काकडा व आरती चालु असते. दि.10.11.2023 रोजी द्वादस असल्या कारणावस्त गावातील भजणी मंडळी रात्री 12.00 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम संपल्यामुळे सर्व गावकरी व भजनी मंडळी आपआपल्या घरी झोपण्यास गेले.
सकाळी 04.00 वाजता गावातील भजनी मंडळी मंदिरात काकडा आरतीसाठी आले असता त्यांना मंदिरातले लाईट बंद दिसले. सर्व वायरींग तोडलेली होती. कुलूपही तोडलेले दिसले. मंदिरात ठेवलेली दानपेटी ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही. म्हणुन गावातील लोकांनी सदरील दान पेटीची पाहणी केली असता ती मिळून आली नाही. नियमाप्रमाणे सदरील दानपेटी दरवर्षी 12 महिन्यानंतर उघडण्यात येते. त्यावेळेस त्यामध्ये 70 ते 75 हजार रुपये दरवर्षी निघतात. भगवान बाबा यांच्या मंदिरात ठेवलेली दानपेटी मध्ये सध्या 40000 ते 45000 रुपये आसावेत ते चोरट्याने दि. 11.11.2023 चे 00.01 वाजेपासून ते 11.11.2023 चे 03.30 वाजेच्या दरम्यान चोरून नेले.
याप्रकरणी गावचे सरपंच दत्ताराव कोंडीबा कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांवर मंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe