महाराष्ट्र
Trending

नांदेड मुंबई नांदेड मार्गे हिंगोली, अकोला द्वी साप्ताहिक विशेष गाड्या !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नांदेड मार्गे वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यां चालवण्याचे ठरवले आहे.

1) 07426 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोमवार  23 आणि 30 ऑक्टोंबर आणि 06 आणि 13 नोवेंबर, 2023

2) 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नांदेड  मंगळवार  24 आणि 31 ऑक्टोंबर आणि 07 आणि 14 नोवेंबर, 2023

3) 07428 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई बुधवार 25 ऑक्टोंबर आणि 01, 08 आणि 15 नोवेंबर, 2023

4) 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नांदेड  गुरुवार  26 ऑक्टोंबर आणि 02, 09  आणि 16 नोवेंबर, 2023

1)  गाडी क्रमांक 07426 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: हि विशेष गाडी नांदेड  येथून  दर सोमवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी  दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.

2)  गाडी क्रमांक 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई नांदेड : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून  दर मंगळवारी दुपारी 16.40 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम,  हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.

3) गाडी क्रमांक 07428 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई:  ही विशेष गाडी नांदेड येथून दर बुधवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भूसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल.

4) गाडी क्रमांक 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई  नांदेड : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर गुरुवारी दुपारी 16.55 वाजता  सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भूसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.

5.  या दोन्ही गाड्यांत वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर क्लासचे डब्बे असतील.

Back to top button
error: Content is protected !!