महाराष्ट्रराजकारण
Trending

भाजपा म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, माफीनामा माफीनामा असे ओरडत ढोंगीपणा बंद करावा: खा. सुप्रिया सुळे

मुंबई, दि. २२ – भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

पोलिसांची कंत्राटी पद्धतीने भरतीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे.

उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती. कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

2011 सालातील मंत्री
1. विजयकुमार गावीत,
2. राधाकृष्ण विखे पाटील,
3. अजित पवार,
4. नारायण राणे,
5. दिलीप वळसे पाटील,
6.छगन भुजबळ,
7. सुनील तटकरे,
8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री ..
1. एकनाथ शिंदे
2. अजित पवार,
3. दिलीप वळसे पाटील,
4. छगन भुजबळ,
5. उदय सामंत,
6. धनंजय मुंडे,
7. शंभूराज देसाई,

8. गुलाबराव पाटील,
9. दादा भुसे,
10. संजय राठोड,
11. संदीपान भुमरे,
12 अब्दुल सत्तार,
13. संजय बनसोडे,
14. आदिती तटकरे

Back to top button
error: Content is protected !!