महाराष्ट्र
Trending

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित पणती डेकोरेशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला बचत गटांनी केली ४ लाखांच्या वस्तूंची विक्री !

मुंबई दि. १० : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी महिलांना महिला बालविकासचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, अल्पसंख्याक विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, मआविमच्या व्यवस्थापकिय संचालक डॉ. इन्दु जाखड यांनी प्रशस्तीपत्रक प्रदान करून अभिनंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयेाजित पणती सजावट स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, स्वाभिमान प्रकल्प (मालाड) येथून आलेल्या महिला बचत गटांचा यात समावेश आहे. १० स्टॉल असून २० महिलांचा यामध्ये सहभाग आहे. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी पणती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना वस्तु खरेदीत २० टक्के सुट देण्यात आली असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाने दिली आहे.

महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री- मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनांचा स्टॉल, हस्तकला तोरण, लेदर वर्क, महिलांची सौंदर्य प्रसाधने या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या स्टॉलमधून महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री केली असल्याची माहिती महिला व आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!