महाराष्ट्र
Trending

तलाठ्याच्या डोक्यात काठीने वार करून चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज लुटला ! एकाच रात्री दोन घर फोडले, अंबडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – सहा चोरट्यांनी तलाठ्यांचे घर फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीस विरोध केला म्हणून चोरट्यांनी तलाठ्यास मारहाणही केली. याशिवाय अंबड शहरात दोन ठिकाणी चोरी तर एका घरात चोरीचा प्रयत्न झाला. एकाच रात्री चोट्यांनी हा धुमाकूळ घातल्याने अंबड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ईश्वरदास अर्जुनराव पावशे (वय 37 वर्षे व्यवसाय नौकरी तलाठी, रा. यशवंत नगर, अंबड, जि. जालना) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. उप जिल्हा रुग्णालय अंबड येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तलाठी ईश्वरदास अर्जुनराव पावशे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, काल दिनांक 20/03/2023 रोजी रात्री अंदाजे दहा साडे दहा वाजेच्या सुमारास ते व त्यांची पत्नी, आई, मुलगी  जेवण करून झोपी गेले.

नंतर दिनांक 21/03/2023 रोजी रात्री अंदाजे आडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाचा आवाज येत असल्याने ईश्वरदास अर्जुनराव पावशे यांनी झोपेतून उठून पाहिले असता सहा अनोळखी (अंदाजे 30 ते 35 वयाचे) घराच्या दरवाज्याचे सेंट्रल लॉक व कडी कोंडा तोडून घरात घुसले. त्या चोरट्यांनी काठीने डोक्यात व डाव्या पायाला मारून ईश्वरदास अर्जुनराव पावशे यांना जखमी केले. चोरट्यांनी धमकावून घरातील लोखंडी कपाट व लाकडी कपाटातील नगदी रुपये व सोन्याचे दागीने जबरीने चोरून नेले. एकूण 6,03000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

तसेच ईश्वरदास अर्जुनराव पावशे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर राहणारे किरायदार रामभाऊ महाले हे घरी नसतांना त्यांच्या घरी देखील चोरी झाल्याचे समजले आहे. तसेच ईश्वरदास अर्जुनराव पावशे यांच्या घरा समोरील भाऊसाहेब रामभाऊ रणमाळे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याशिवाय महालक्ष्मी नगर अंबड येथील अर्जुन अंकुशराव माकोटे यांच्या घरी चोरी झाल्याचे समजले आहे.

याप्रकरणी तलाठी ईश्वरदास अर्जुनराव पावशे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी सहा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस त्या चोरट्यांचा कसून शोध घेत आहे.

Back to top button
error: Content is protected !!