वैजापूर रोटेगाव रोडवरील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! तिर्रट खेळणाऱ्या २० जणांना घेतले ताब्यात, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- वैजापूर शहरातील आनंदनगर येथील उच्चभ्रू वसाहतीतील ग्रिन नेट शेडमध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. 20 आरोपीच्या ताब्यातून 31,88,627/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1) ऋषिकेश संजय राऊत वय 25 वर्षे रा. लाडवाणी, वैजापूर 2) अफरोज शेख जब्बार वय 41 वर्षे रा. नांदगाव रोड, येवला, 3) सुनील हरिभाऊ गिरी वय 48 वर्षे रा. वैजापूर 4) शेषराव विठ्ठल नवले वय 48 वर्षे रा. खोपडी ता. कोपरगाव 5) शकील शरीफ पठाण वय 48 वर्षे रा. वैजापूर 6) मनोहर ताराचंद घोलप वय 30 वर्षे रा. मनमाड ता. नांदगाव 7) राजु रुपचंद शिंदे वय 45 वर्षे रा. राहुरी ता. राहुरी. 8) रवि मच्छींद्र मुळे वय 29 वर्षे रा. वैजापूर 9) कैलास नारायन लुटे वय 56 वर्षे रा. कोल्हार ता. राहता
10) चंद्रपाल भगतसिंग राजपुत वय 42 वर्षे रा. वैजापूर 11) शेख फय्याज शेख शेख गनी वय 36 वर्षे रा. वैजापूर 12) बाबासाहेब लक्ष्मण गायकवाड वय 38 वर्षे वैजापूर 13) अशोक बापुराव टिळेकर वय 39 वर्षे रा. वैजापूर 14) सुनिल बाळासाहेब लोटके वय 45 वर्षे रा.श्रीरामपूर जि.अ.नगर 15) हितेश गोपालदास रामैय्या वय 36 वर्षे रा. वैजापूर 16) दयानंद रतन जावळे वय 52 वर्षे रा.येवला 17) संतोष शामराव पवार वय43 रा. राहुरी ता. राहुरी 18) निलेश गोपीनाथ लोंढे वय 33 वर्षे रा.येवला 19) दीपक रमेश इंगळे वय 50 वर्षे रा. राहुरी ता. राहुरी 20) संजु कचरू जाधव वय 45 रा. महालगाव ता. वैजापूर अशी त्यांची नावे आहेत.
या कारवाईमध्ये रोख 79,637/- रुपयांसह 04 चारचाकी वाहने, 14 दुचाकी वाहने, 16 मोबाईल फोन, 57 पत्ताचे कॅट, 45 प्लॉस्टीकचे कॉईन इतर जुगाराचे साहित्य असे एकूण 31,88,627/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरुध्द पोलीस ठाणे वैजापूर येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे वैजापूर करित आहेत.
सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना दिनांक 01/6/2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की वैजापूर – रोटेगाव रोडवरील अमर हॉटेलच्या पाठीमागील आनंदनगर मधील उच्च भ्रू लोक वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपाल राजपुत यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत ग्रिन नेटचे शेड टाकून यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हयाचे बाहेरील व्यक्ती सहभागी होवून पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
यावरून महक स्वामी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांची तीन पथके तयार करून अत्यंत गोपनीय पध्दतीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहचून पथकांना कारवाईच्या अनुषंगाने परिसरात घेराव घालून सापळा लावला. यावेळी पोलिसांची रेकी करण्यासाठी काही अंतरावर एक जण ठेवण्यात आला होता. जेणे करून पोलिसांची चाहुल लागताच जुगारींना माहिती पोहोचून ते सावध होऊन पळून जातील.
याबाबत महक स्वामी यांनी पेालिसांची वेगवेगळी पथके तयार करून पथकातील पोलिसांनी या संपूर्ण परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी व पडताळणी करून सापळा लावला. छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलिसांचे पथकांनी 17:45 वाजता पोलिसांचे पथकांने लपत छपत जावून पडताळणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेली दिसून आली व त्या समोरिल मोकळ्या जागेतील ग्रिन नेट शेडमध्ये काही जण हे पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळतांना दिसून आले. यावरून पथकांनी अचानक घेराव टाकून छापा टाकला असता पोलिसांचे अचानकच्या कारवाईने जुगार खेळणारांची धांदल उडाली व यातील काही जण हे मिळेल त्या रस्त्याने सैरावैरा पळत सुटले परंतु पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत 20 जणांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी , साहाय्यक पोलीस अधीक्षक, निशा बनसोड, स.पो.नि. श्रीराम केळे, पो.उप.नि.पोलीस अंमलदार अजबसिंग गोलवाल, शिवनाथ सरोदे, अमोल मोरे, संजय घुगे, गोपाल जोनवाल, वर्षा गाडेकर, सविता मोटे, मोना पवार यांनी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe