महाराष्ट्र

लग्नाआधीच पार केलेल्या सीमा पतीला कळल्या… त्याने सोडले, प्रियकरानेही पाठ फिरवली… तरुणीने भर न्यायालयात प्रियकरावर कटरने चढवला हल्ला!, यवतमाळची आहे घटना

यवतमाळ, दि. १५ ः लग्नाआधीचे प्रेमसंबंध पतीला माहीत झाले, पतीने सोडले… दुसरीकडे प्रियकरानेही पाठ फिरवली… त्यामुळे संतप्त तरुणीने भर न्यायालयातच प्रियकरावर कटरने हल्ला चढवला. ही खळबळजनक घटना काल, १४ डिसेंबरला दुपारी घडली. कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांनी तरुणीला आवरल्याने प्रियकर जखमी होण्यावर निभावले.

विशाल मारोतराव शेंडे (४५, रा. शिंदेनगर, यवतमाळ) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. हल्ला करणाऱ्या तरुणीसोबत महिलेचे प्रेमसंबंध होते. घरच्यांच्या दबावाखाली येऊन तरुणीने दुसऱ्या एका तरुणासोबत विवाह उरकला होता. मात्र लग्नाच्या आड येईल म्हणून तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराविरुद्ध लग्नाच्या आधीच विनयभंगासह वेगवेगळे स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते.

या गुन्ह्यांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. पतीच्या समोर ही बाब दुसरीकडून येण्याआधी तरुणीने एक तरुण मला त्रास देत होता, त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे, अशी जुजबी माहिती दिली होती. प्रत्यक्ष सुनावणीवेळी पतीला आपली पत्नी लग्नाआधी किती वाहवत गेली होती व तिने सर्व सीमा पार केल्या होत्या, हे कळले. त्याने तिच्याकडून घटस्‍फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी न्यायालयात अर्जही केला.

आपणच आपल्या कारस्थानात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने प्रियकराकडे प्रेमसंबंध निभावण्याची गळ घातली. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे तरुणी संतप्त होती. तिने प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. त्यावर त्यानेही तक्रार दिली. या परस्परविरुद्ध तक्रारींवर पुन्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली. आठ क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी सुरू असताना अचानक संतप्त झालेल्या तरुणीने कटरने प्रियकरावर हल्ला चढवला.

कटरचा वार विशालच्या गालावर लागला. तेथे उपस्थित कोर्ट पैरवी रमेश उघडे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोर तरुणीला ताब्यात घेतले. तोपर्यंत महिला पोलीस आले. जखमी विशालला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असून, शहर पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!