गंगापूर
Trending

ग्रामसभेत कामाचा हिशेब मागितला म्हणून चाकू हल्ला ! गंगापूर तालुक्यातील विटाव्यात राडा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – भावाने ग्रामसभेत कामाचा हिशेब मागितला म्हणून चाकू हल्ला चढवण्यात आला. गंगापूर तालुक्यातील विटाव्यात हा राडा झाला. याप्रकरणी १० ते ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

1) रोहन बाबासाहेब घुले, 2) उत्तरेश्वर घुले, 3) तात्याराव आघाव, 4) कमलाकर शेफू, 5) परमेश्वर घुले (पाच ते सहा जण) अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात बालाजी बाबूराव सूर्यवंशी (वय ३५, रा. विटावा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक 28/04/2023 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास गावात ग्रामसभा व मासिक मिटींग झाली. बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांचा भाऊ बळवंत सूर्यवंशी यांनी इटावा ग्रामपंचायातचा हिशोब मागितला म्हणून मासिक सभेतून बाबासाहेब लक्ष्मण घुले हा बाहेर बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांना म्हणाला की तुझ्या भावाने मासिक समेत कारण नसताना कामाचा हिशोब मागितला.

तुम्हाला आता पाहून घेतो. नंतर सध्याकांळी 07.15 वाजेच्या सुमारास बालाजी बाबूराव सूर्यवंशी हे त्यांच्या कंपणीच्या शॉप समोर उभा असताना बाबासाहेब घुलेचा भाचा बाळासाहेब मुंढे हा बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांच्याकडे आला व म्हणाला की माझ्या मामाकडे चला. म्हणून बालाजी बाबूराव सूर्यवंशी हे त्याच्या सोबत बाबासाहेब घुले यांच्याकडे गेले. तेव्हा बाळासाहेब घुले यांनी बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांच्या श्रीमुखात भडकावली.

त्यावेळी तेथे रोहन बाबासाहेब घुले, उत्तरेश्वर घुले, तात्याराव आघाव, कमलाकर शेफ, परमेश्वर घुले व पाच ते सहा व्यक्ती हजर होत्या. त्यापैकी बाळु मुंढे यांनी व इतरांनी शिवीगाळ करून जास्त माजला का तुला पाहून घेतो असे म्हणून हाताचापटाने मारहाण केली. तसेच बाळु मुंढे यांनी त्याच्या हातातील चाकूने बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांच्यावर वार केला. त्यात बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांच्या डोळ्याच्या खाली तसेच डाव्या मिशीवर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, त्याठिकाणी बघ्याची गर्दी जमत असल्याने बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांना मारहाण करणारे तेथून पळून गेले.

याप्रकरणी बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1) रोहन बाबासाहेब घुले, 2) उत्तरेश्वर घुले, 3) तात्याराव आघाव, 4) कमलाकर शेफू, 5) परमेश्वर घुले (पाच ते सहा जण) यांच्यावर एम वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनी राजेंद्र बांगर करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!