छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

हर्सूल, तिसगाव व पडेगावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागांची पाहणी ! प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले हे निर्देश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागांची पाहणी केली. तिसगाव येथील गट क्रमांक 225/1 आणि गट क्रमांक 227/1, पडेगाव येथील गट क्रमांक 69, हर्सूल येथील चेतना नगर येथील जागा आणि सुंदर वाडी येथील गट नंबर 9 आणि 10 या जागांची पाहणी केली आणि सखोल माहिती आणि आढावा घेतला.

यावेळी तिसगाव येथील जागा डोंगराला खेटून असून त्यांनी डोंगरावर चढून या दोन्ही जागांची पाहणी केली. यावेळी हर्सूल येथील जागाची पाहणी करताना प्रशासकांच्या असे निदर्शनास आले की या ठिकाणी 110 झोपड्या टाकून भूमीहीन लोक राहत आहे. यांना देखील घरकुल योजनेत लाभ देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता एबी देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गरजे, उप आयुक्त अपर्णा थेटे, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विटखेडा नाल्याची पाहणी– यावेळी विटखेडा येथील नाल्याची सुशोभीकरण बाबत प्रशासक महोदयांनी या ठिकाणी स्थळ पाहणी केली. यावेळी नाथ ग्रुप आणि इकोसत्वा यांनी सदरील नाल्याचे सौंदर्यकरणचे प्लॅन प्रशासक महोदयांना दाखवले. याच्यावर चर्चा करताना प्रशासक महोदयांनी सदरील काम करण्याची मंजुरी दिली तसेच या ठिकाणी दोन लाख लिटर क्षमतेच्या डी सेंट्रलाईज जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, नाल्यावरती पुलावर वर्टीकल गार्डन उभारणे आणि खाम नदीच्या धरतीवर या नाल्याचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले.

साईनगर पोलिस कॉलनी येथे कचरा विलगीकरण बाबत विचारणा- पडेगाव येथील गट क्रमांक 69 ची जागाची पाहणी केल्यानंतर प्रशासक पडेगाव येथील साईनगर पोलीस कॉलनी या वसाहतीला भेट देण्यास गेले असता तिथे त्यांना घंटागाडी दिसली. संबंधित घंटागाडी चालकाला त्यांनी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतो का, घंटागाडीला जीपीएस यंत्रण लावलेला आहे का? तसेच घंटागाडी आली याबाबत नागरिकांना कसा कळते याची विचारणं नागरिकांशी त्यांनी यावेळी केली.

ट्रान्सपोर्ट नगर कामाची पाहणी– यावेळी प्रशासक मोत्यांनी जाधववाडी येथील प्रगतीपथावर असलेले ट्रान्सपोर्ट नगर आणि स्मार्ट सिटी बस डेपो कामाची स्थळ पाहणी केली आणि आढावा घेतला यावेळी त्यांनी बसेस वळण्यासाठी पुरेशी जागा ठेवण्याची निर्देश दिले.

Back to top button
error: Content is protected !!