नवजीवन कॉलनी, सिडकोत गुन्हे शाखेची छापेमारी, राहत्या घरातून १० लाखांचा गुटखा जप्त !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- गुन्हे शाखेच्या पथकाने नवजीवन कॉलनी, सिडकोत छापा टाकला. नवजीवन कॉलनी, सिडको येथील राहत्या घरातून 10 लाख 04 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, नवजीवन कॉलनी, सिडको भागातील एका घरामध्ये प्रतिबंधीत गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला आहे. त्यावरुन पंढरीनाथ कारभारी मालोदे यांचे नवजीवन कॉलनी, ए-121, एन 11, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरामधून गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह छापा मारला.
10,04,154/- रुपये किमतीचा प्रतिबधीत गोवा गुटखा, हिरा गुटखा व इतर प्रतिबंधीत पानमसाल्याचा साठा जप्त केला. गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु व सुगंधीत सुपारी यांचे सेवन मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे विविध सर्वेक्षण व संशोधनामधून सिध्द झालेले आहे, तसेच या पदार्थाच्या सेवनामुळे खाणा-या व्यक्तीस कर्करोग, ह्रदयरोग, मुखाचा कर्करोग, आतडयाचे व श्वसनमार्गाचे कर्करोग असे विकार होवून गंभीर दुखापत होते हे माहिती असतानांही प्रतिबंधीत गुटखा व पानमासाला यांचा साठा केला असल्याने त्याचे विरुध्द पोलीस ठाणे सिडको येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय.) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, पोलीस उप निरीक्षक प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार योगेश नवसारे, दत्तात्रय गढेकर, विजय भानुसे, विजय घुगे, कैलास काकड, काकासाहेब आधाने, अश्वलिंग होनराव, अनिता त्रीभुवन सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर व अन्न सुरक्षा अधिकारी निखील कुलकर्णी यांनी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe