छत्रपती संभाजीनगर
Trending

एटीएम मशिनमधून चोरीचा नवा फंडा, पैसे येणाऱ्या जागेवर वस्तू ठेवून २० हजार लंपास ! जालना रोडवरील सेव्हन हिलच्या कॅनरा बॅंकेच्या एटीएममधील खळबळजनक प्रकार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- चोरट्यांनी आता एटीएम मशिनमधून चोरीचा नवा फंडा शोधून काढला आहे. पैसे येणाऱ्या जागेवर वस्तू ठेवून २० हजार लंपास केल्याची घटना जालना रोडवरील सेव्हन हिलच्या कॅनरा बॅंकेच्या एटीएममध्ये घडली. ज्या ग्राहकाने एटीएममध्ये कार्ड टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र, ग्राहकाला ते पैसे काढताच आले नाही. सदर ग्राहक बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी पैसे येणाऱ्या जागेवर ठेवलेली वस्तू काढून तोडीफार तोडफोड करून २० हजार लंपास केल्याच्या या प्रकाराने ग्राहकांत  खळबळ उडाली आहे. हा प्रकार सकाळी ९ ते १० वाजेदम्यान घडला.

शंतनु शिरीष भार्गवे यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते कॅनरा बँक शाखा SME 1 सेवन हिल जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे ब्रांच मॅनेजर / चिफ मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दि. 12/11/2023 रोजी सकाळी 08.45 ते 10.00 वाजेदरम्यान कॅनरा बँकेचे एटीएम सेवन हिल जालना रोडवर दोन अनोळखी लोकांनी एटीएममध्ये प्रवेश करून एटीएम मशीनची छेडछाड केली.

पैसे येणा-या जागेवर काहीतरी वस्तू टाकून एटीएमच्या बाहेर निघून गेले. त्यानंतर पैसे काढण्यासाठी एक ग्राहक आला. त्याने एटीएम मशीनमधुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा पैसे निघाले नाही म्हणून तो काही वेळ थांबून एटीएम मधून निघून गेला.

नंतर थोड्या वेळाने परत दोन अनोळखी एटीएममध्ये आले व त्यांनी एटीएम मशिनच्या पैसे येणा-या जागेवरील त्यांनी पूर्वी टाकलेली वस्तु काढुन एटीएम मशिनच्या पैसे निघणा-या जागेवरील पट्टीचे (डिस्पेन्सरी) छेडछाड करून तोडून नुकसान करून 20,000 रुपये चोरुन नेले. रविवार व सुट्टी असल्याने शाखा व्यवस्थापक शंतनू भार्गवे हे दि. 13/11/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांच्या सहकार्यासह एटीएम मशिनला भेट दिली. सिसीटीव्ही फुटेज पाहून सदरचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती बँकेचे एटीएम मॉनिटरींग सेल ऑफिसर यांना दिली.

कॅनरा बॅंकेचे शाखा व्यवस्थापक शंतनु शिरीष भार्गवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!